आरती भुवनसुंदराची
आरती
1
आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ ॥
2
पद्मसम पादयुग्मरंगा । ओंवाळणी होति भृंगा । नखमणि श्रवताहे गंगा । जे कां त्रिविधतापभंगा ॥
3
वर्तुळ गुल्फ भ्राजमाने । किंकिणीक्वणित, नाद घणघणित, बांकिवर झुणित, नेपुरें झनन मंजिरीची । झनन ध्वनी मंजिरीची ॥१॥ आरती भुवन
4
पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंबसुस्थानीं । नाभिची अगाध हो करणी । विश्वजनकाची जे जननी ॥
5
त्रिवलीललित उदरशोभा । कुंबुगळां माळ विलम्बित, झळाळ कौस्तुभ, सरळ बाहु श्रिवत्स तरल मणि मरळ कंकणाची । प्रीति बहु, जडित कंकणाची ॥२॥ आरती भुवन
6
इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्कबिंबवदना । पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेयब्धि दैत्यदमना ॥
7
झळकत महरकुंडलाभा । कुटिल कुंतलीं, मयुरपत्रावली वेष्टिली, तिलक भालिं, केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची । अक्षता काळि कस्तुरीची ॥ ३॥ आरती भुवन
8
कल्पद्रुमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदिप्ती । गोपीगोपवलयभंवती । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥
9
मंजुळ मधुर मुरलिनदें । चकित गंधर्व, चकित अप्सरा, सुरागिरिवरा, धरा कर्पुरारतीनें प्रेमयुक्त सची । आरती ओंवळित साची ॥ ४॥ आरती भुवन
10
वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी । श्रमलों भवाभ्धिचे फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ॥
11
अहा हे पूर्ण पुण्यश्लोका । नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विशालपाणी, कृष्ण नेणतें बाळ आपुलें, राखि लाज याची ॥ ५॥ आरती भुवन