श्री दत्त आरती

आरती

1

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्यान ॥

2

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरति ओवाळीता हरली भवचिन्ता ॥ जय देव

3

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैसी नकळे ही मात । पराही परतली कैसा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ जय देव

4

दत्त येऊनीया उभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला । ( साष्टांगे नमने प्रणिपात केला ।) प्रसन्न होउनीया आशीर्वाद दिधला । जन्मा मरणाचा फेरा वाचविला ॥ जय देव

5

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झले उन्मन । मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥ जय देव