धूपारती

आरती

1

जय देव जय देव पंढरीराया । धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ॥ धृ॥

2

सोज्ज्वळ अग्निरूप निजतेजोराशी । अहंभाव धूप कृपें जाळीसी ॥

3

त्याचा आनंद माझे मानसीं । तव दर्शनमोदें सुख हें सर्वांसी ॥ १॥

4

पूर्णानंद देवा तूं सच्चिदानंदा । परमात्मा तूं अससी आनंदकंदा ॥

5

पूर्ण करीं तूंची भक्तांच्या छंदा । अंगीकारुन धूप दे ब्रह्मानंदा ॥ २॥