दीपारती
आरती
1
जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ॥ धृ॥
2
स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ति। । पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ॥
3
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती । ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ॥ १॥
4
देव तुज पाहता येतो प्रेमपूर । नाम निरंतर गातां होतो भवपार ॥
5
वाटे तव भक्ती ही प्रियकर । विष्णुदासा देई अखंड हा वर ॥ २॥