दुर्गा आरती
आरती
1
दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अम्बे करुणाविस्तारी । वारी वारी जन्म मरणांते वारी । हारी पडलो आता संकट नेवारी ॥ १॥
2
जय देवी जय देवी महिषासुरमथिनि । सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ॥ धृ॥
3
तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसि लवलाही ॥ २॥
4
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अम्बे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३॥