श्री गणेश आरती

आरती

1

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥

2

जय देव जय देव जय मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मन कामनापुर्ती ॥ जय देव

3

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची ऊटी कुंकुम केशरा । हीरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव

4

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय देव