हनुमान आरती
आरती
1
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करि डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी । कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर चर निशाचर त्या झाल्या पळनी ॥ १॥
2
जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादे नाभे कृतांता जय देव जय देव दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानीला खेद । कडाडिले पर्वत उड्डगण उच्छेद रामी रामदासा शक्तिचा शोध ॥ २॥ जय देव