कांकड आरती — भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योती

आरती

1

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवेंभावें ओवाळूं आरती ॥ १॥

2

ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥ धृ॥

3

काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ २॥

4

राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं । मयूरपिच्छचामरें ढाळिती ठाईंच्या ठाई ॥ ३॥

5

विटेसहित पाय म्हणुनी भावें ओवाळूं । कोटी रवि शशी दिव्य उगवले हेळू ॥ ४॥

6

तुका म्हणे दीप घेउनी उन्मनींत शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५॥