कांकड आरती

आरती

1

उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित ॥

2

गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ १॥

3

उठा उठा हो वेगेंसीं । चला जाऊं राऊळासी ॥

4

हरतिल पातकांच्या राशी । कांकड आरती पाहोनी ॥ धृ॥

5

उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे ॥

6

चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टीं अवलोका ॥ २॥

7

जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा ॥

8

वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥ ३॥

9

पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती ॥

10

होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची ॥ ४॥

11

सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ॥

12

केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥ ५॥