श्री कृष्णाची आरती

आरती

1

ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ॥

2

चरणकमल ज्याचे अति सुकुमार । ध्वजव्रजाङ्कुश ब्रीदाते तोडर ॥ १॥

3

नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदया पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ २॥

4

मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी । मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ॥ ३॥

5

जडितमुगुट ज्याच्या देदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ॥ ४॥

6

एका जनार्दनीं देखियेले रूप । रूप पाहों जातां झालेसें तद्रूप ॥ ५॥