श्री मंगळागौरीची आरती

आरती

1

जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ॥

2

रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ॥ धृ॥

3

मंगळमूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ॥

4

तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ॥ १॥

5

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ॥

6

सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ॥

7

पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ॥ २॥

8

साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ॥

9

आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ॥ ३॥

10

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ॥

11

शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ॥ ४॥

12

न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ॥

13

स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ॥ ५॥

14

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ॥

15

करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ॥ ६॥

16

लवलाहें तिघें काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवूं विसरली ॥

17

मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली । । देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ॥ ७॥