आरती महालक्ष्मीची
आरती
1
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता । प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥ धृ॥
2
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता । धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥ १॥
3
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही । धावसी आम्हालागी पावसी लवलाही ॥ २॥
4
त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती । सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ॥ ३॥
5
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे । देसि दान वरदे सदैव सौख्याचे ॥ ४॥
6
यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी । प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ॥ ५॥