मनोबोधाची आरती
आरती
1
वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार । प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार । कर्म उपासना ज्ञान गंभीर । ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥
2
जय देव जय देव जय मनोबोधा । पंचप्राणें आरति तुज स्वात्मशुद्धा ॥
3
जय देव जय देव ॥
4
दोन शतें पांच श्लोक हे जाण । श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥
5
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण । यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥
6
जय देव जय देव ॥