नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें

आरती

1

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ॥

2

ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्तहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥ १॥

3

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥

4

तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ धृ॥

5

तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ॥

6

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥ जय देव ॥ २॥

7

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । कीर्ति तयांची राहे जोंवरि शशितरणी ॥

8

त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥ जय देव॥ ३॥