नैवेद्य आरती
आरती
1
जय देव जय देव जय विठाबाई । पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ॥ धृ॥
2
षड्रसपक्वान्नें हीं अर्पित तुज माई । कृपा करुनी तीं तूं मान्य करुनि घेई ॥
3
तृप्ती सर्व जीवां जेवितां तूं आई । जीवन सर्वांचें हें असे तव पायीं ॥ १॥
4
आनंदें भोजन करावें आतां । यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ॥
5
प्रसाद तो देई आपुल्या भक्ता । हेंचि मागें ठेवूनि तव चरणीं माथा ॥ २॥
6
॥ नीरांजन आरती ॥
7
पंचप्राणांचें नीरांजन करुनी । पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ॥
8
मोहममतेनें समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ॥ १॥
9
जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ॥ धृ॥
10
ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ॥
11
पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ॥ २॥ ॥ धृ॥