निरोप आरती
आरती
1
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ॥
2
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों । प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥ १॥
3
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना । रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २॥
4
मागणें तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे । तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ॥ ३॥
5
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया । प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ॥ ४॥
6
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं । हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५॥
7
वारुनियां संकटें आतां आमुचीं सारी। आतां आमुची सारी । कृपेची साउली देवा दीनावरि करीं ॥ ६॥
8
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी । सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७॥
9
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी । चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ॥