श्री रामचंद्राची आरती

आरती

1

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी । लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ॥

2

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १॥

3

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ ॥

4

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥

5

मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला । आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ जय ॥ २॥

6

निजबळें निजशक्ति सोडविली सीता । म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ॥

7

आनंदें वोसंडे वैराग्य भरता । आरती घेऊन आली कौसल्या माता ॥ जय ॥ ३॥

8

अनाहतध्वनी गर्जती अपार । अठरा पद्में वानर करिती भुभुःकार ॥

9

अयोध्येसी आले दशरथकुमार । नगर्ईं होत आहे आनंद थोर ॥ ॥ जय ॥ ४॥

10

सहज सिंहासनीं राजा रघुवीर । सोऽहंभावें तया पूजा उपचार ॥

11

सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥

12

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ ५॥