श्री संत गजानन महाराजांची आरती

आरती

1

जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ॥

2

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ॥

3

तें तूं खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १॥

4

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करुनी गणि गण गणात बोते या भजना ॥

5

धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ २॥

6

लीला अनंत केल्या बकटसदनास। पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ॥

7

क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ ३॥

8

व्याधि वारुन केले कैंकां संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ॥

9

भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ ४॥