आरती साईनाथांची
आरती
1
जय देव जय देव जय साईनाथा ॥ श्री सद्गुरुनाथा ॥
2
विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ॥ धृ॥
3
ब्रह्माण्डाचा नायक देवा तू कळले । प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले ॥
4
ब्रह्मा विष्णु शङ्कर गणपती तू त्राता । भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता ॥ १॥
5
हरूनि दारिद्र्याते रंका रक्षियले । रोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले ॥
6
वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा । जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता॥ २॥
7
ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना । सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना ॥
8
ऐशी तू सकलांची ममताळू माता । रोमांचित तनु होई गुण महिमा गातां ॥ ३॥
9
यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले । आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले ॥
10
ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां । शिणली मति मग आलों शरण तुला नाथा ॥ ४॥
11
मद्वचनी विश्वासुनि जे सेवा करिती । त्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी ॥
12
ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता । करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा ॥ ५॥
13
समतेची योगाची मूर्ती श्री साई । ऋद्धिसिद्धी घेती लोळण तव पायीं ॥
14
अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता । अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता ॥ ६॥
15
लाभे फळ करितां तव नवस समाधीला । दाखविसी अद्यापी निज साद लीला ॥
16
चुकतां पथ दर्शविसी देउनि दृष्टांता । हीना दीनांचा तू स्वामी हितकर्ता ॥ ७॥
17
जन्मोजन्मी मजला घडुं दे श्रीदेवा । आशीर्वचनाची तव लाभो मज सेवा ॥
18
घालुनिया लोटांगण याचितसे नाथा । पापात्मा मी यास्तव लोटुं नका परता ॥ ८॥