श्री शंकर आरती

आरती

1

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुन्दर मस्तकी वाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव

2

जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ जय देव

3

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव

4

देवी दैत्य सागर मंथन पै केले । त्यामाजी अवचीत हलहल जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले । नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव

5

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटीळक रामदासा अंतरी ॥ जय देव