श्रीगीतेची आरती
आरती
1
जय देवी जय देवी जय भगवद्गीते । आरती ओवाळूं तुज वेदमाते ॥ धृ॥
2
सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची । अगाध महिमा तुझा नेणे विरंची ॥
3
ते तूं ब्रह्मी होतिस लीन ठायींची । अर्जुनाचें भावें प्रकट मुखींची ॥ जय ॥ १॥
4
सात शतें श्लोक व्यासोक्तीसार । अष्टादश अध्याय इतुका विस्तार ॥
5
अर्ध पाद करितां उच्चार । स्मरणमात्रें त्यांच्या निरसे संसार ॥ जय ॥ २॥
6
काय तुझा पार नेणें मी दीन । अनन्यभावें तुजला आलों मी शरण ॥
7
सनाथ करीं माये कृपा करून । बापरखुमादेवीवरदासमान ॥ जय ॥ ३॥