श्रीहरितालिकेची आरती

आरती

1

जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ॥

2

आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ॥ धृ॥

3

हरअर्धांगीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ॥

4

तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ॥ १॥

5

रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥

6

उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ २॥

7

तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ॥

8

केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ं ॥ ३॥

9

लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ॥

10

पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ॥ ४॥

11

काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ॥

12

मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ॥ ५॥