श्रीरामदासाची आरती

आरती

1

आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ॥

2

उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ धृ ॥

3

साक्षात शंकराचा । अवतार मारुती ॥

4

कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ती ॥ १॥

5

वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥

6

जडजीवां उद्धरीलें । नृप शिवासी तारिलें ॥ २॥

7

ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सद्गुरुपाय ॥ ३॥