श्रीसंतोषीमातेची आरती

आरती

1

जय देवी श्री देवी संतोषी माते । वंदन भावें माझें तव पदकमलातें ॥ धृ॥

2

श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी । पावसी भक्तालागीं अति सोप्या यत्नीं ॥

3

जननी विश्वाची तूं जीवन चिच्छक्ती । शरण तुला मी आलों नुरवी आपत्ती ॥ १॥

4

भृगुवारीं श्रद्धेनें उपास तव करिती । आंबट कोणी कांहीं अन्न न सेवीती ॥

5

गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती । मंगल व्हावें म्हणुनि कथा श्रवण करिती ॥ २॥

6

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती । अनन्य भावें तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥

7

त्याच्या हांकेला तूं धांवुनिया येअसी । संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ॥ ३॥

8

विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावें । भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥

9

मनींची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी । म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४॥