श्रीशनिदेवाची आरती

आरती

1

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥

2

आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ॥ धृ॥

3

सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥

4

एक मुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ १॥

5

नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ॥

6

ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ॥ २॥

7

विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥

8

गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियलें त्यासी ॥ ३॥

9

शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ॥

10

साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥ ४॥

11

प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ॥

12

नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ॥ ५॥

13

ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ॥

14

कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ॥ ६॥

15

दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ॥

16

प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावीं ॥ ७॥