श्रीतुकारामाची आरती
आरती
1
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥
2
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ॥ धृ॥
3
राघवें सागरांत । पाषाण तारीले । । तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ॥ १॥
4
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ॥
5
म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ २॥