तुळशीची आरती
आरती
1
जय देवी जय देवी जय तुळसी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥ धृ॥
2
ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी । अग्रीं शंकर तीर्थें शाखा परिवारीं ॥
3
सेवा करिती भावें सकळहि नरनारी । दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ १॥
4
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी । मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ॥
5
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी । विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ॥ २॥
6
अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ॥
7
त्यासी देसी संतति संपति सुखकारी । गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३॥