वटसावित्रीची आरती
आरती
1
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥
2
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ॥
3
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥
4
आरती वडराजा ॥ १॥
5
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥
6
भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ धृ॥
7
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ॥
8
त्रिरात्र व्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी । आरती वडराजा ॥ २॥
9
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ॥
10
धर्मराजा उचकला। हत्या घालील जीवाला । येई ग पतिव्रते ॥ पती नेई गे आपुला ॥
11
आरती वडराजा ॥ ३॥
12
जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ॥
13
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ॥
14
आरती वडराजा ॥ ४॥
15
पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ॥
16
तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ॥
17
आरती वडराजा ॥ ५॥
18
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ॥
19
स्वर्गीं पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती । अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ॥ ६॥