विठठल आरती २
आरती
1
येई हो विठ्ठले माझे माऊली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे … ॥धृ ॥
2
आलिया गेलिया हाती धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप … ॥ १ ॥
3
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला । गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला … ॥ २ ॥
4
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी … ॥ ३ ॥