विठ्ठल आरती

आरती

1

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥

2

जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा । पावे जिवलगा ॥ जय देव

3

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनूमंत पुढे उभे राहती ॥ जय देव

4

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाइ राणीया सकळा । ओवाळू आरत्या विठोबा सावळा ॥ जय देव

5

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव

6

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करती । दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ जय देव